दीर्घकाळ टिकणारे हेअर कलर

सलोनमधून अचूक हेअर कलर लावून बाहेर पडताना तुम्हाला जगाच्या सर्वोच्च स्थानी असल्यासारखं वाटू शकतं. पण काही आठवडे आणि एक-दोन वेळा शांपू केल्यानंतर, तुमचा हेअर कलर त्याच्या आधीच्या अवस्थेच्या तुलनेत भुतासारखा दिसतो. पण तो तसा होण्याचे काही कारण नाही. तुमचा कलर अधिक काळ टिकण्यासाठी काही ट्रीक्स इथे दिलेल्या आहेतः

1. उष्णता कमी कराः
पायपिंग-गरम शॉवर्स जितके चांगले वाटतात तितकीच वस्तुस्थिती ही आहे की ते कोरड्या, रुक्ष केसांना कारणीभूतही ठरतात. सुपर-हॉट पाण्यामुळे केसांचे क्युटिकल्स उघडे होतात आणि हेअर कलर धुवून जातो.

2. तुमच्या केसांना आच्छादन द्याः
उन्हाळ्यामध्ये, तुमच्या केसांचे UV किरणांपासून रक्षण करणे महत्वाचे आहे. ज्यामुळे तुमची शेड फिकट होत जाते. घराच्या बाहेर असताना एखादी हॅट किंवा स्कार्फ घालावा म्हणझे तुमचा कलर प्रखर राखता येईल.

3. एखादा शांपू सोडून द्याः
प्रत्येक एक्सपर्ट मान्य करेल अशी एक गोष्ट आहे ती म्हणजे, तुमचे केस वारंवार धुण्याममुळे त्यांचं चांगलं होण्याऐवजी नुकसानच होऊ शकतं.  तुमच्या टाळूवरुन चिकटपणा काढून टाकण्याचा उद्देश असलेले शांपू हेअर कलर अधिक वेगाने फिकट होण्याचे कारण बनवतात.  पर्यायाने, तुम्ही फिकटपणा लवकर येणं टाळण्यासाठी कलर-सेफ शांपू वापरु शकता.

 

4. अधिक कंडीशनर वापराः
आपण आपले केस कलर्ड केल्यानंतर, अधिक कंडीशनर वापरणे महत्वाचे आहे. हेअर एक्सपर्ट्स बरेचदा सांगतात की आपला हेअर कलर दीर्घकाळ टिकण्यासाठी अधिक कंडीशनर वापरावा.

5. आपले केस कमी वेळा धुवावेतः
आपल्या केसांना कलर केल्यानंतर, तुमच्या केसांवर शांपू कमीतकमी वेळा वापरा. केस शांपू आणि पाण्याच्या जितके अधिक संपर्कात येतील, तितक्या लवकर कलर फिकट व्हायला सुरुवात होईल.

आपला हेअर कलर दीर्घकाळ टिकण्याची खात्री करण्यासाठी या काही ट्रीक्स तुम्ही वापरु शकता.

नवीनतम कथा

Articles

लहान केसांसाठी 5 सोप्या केशरचना

'लांब केस'हे नेहमीच भारतीय सौंदर्याचे प्रमाण मानले गेले आहेत.बदलत्या काळानुसार,स्त्रिया त्यांच्या दिसण्यावर अनेक प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या लक्षात आले आहे की लहान केस देखील तितकेच आकर्षक व ट्रेंडी दिसतात.इतकेच…

Articles

बरगंडी रंगाच्या साह्याने मिळवा ग्लॅम लूक

भारतीय विवाहसोहळा हा ३-४ विधींशिवाय अपूर्ण असतो. अशा वेळेस जर आपण वधू किंवा वर यांचे जवळचे नातेवाईक असाल तर आपण प्रत्येक कार्यक्रमात  उपस्थित रहाणे आवश्यक असतं आणि त्यातील प्रत्येकात आपण…