घरच्या घरी आपले केस कलर करण्यासाठी आवश्यक गोष्टी

घरच्या घरी हेअर कलरींग करणं मजेदार वाटू शकतं पण ते आव्हानात्मक देखील आहे, कारण त्यासाठी भरपूर काळजी घ्यावी लागते. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रिम हेअर कलरद्वारे, तुम्ही आपले केस कोणत्याही त्रासाविना घरच्या घरी सहजपणे कलर कर शकता. घरच्या घरी हेअर कलरींग करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टींची एक यादी आहे, त्यावर नजर टाका.

आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींची सूची/यादी येथे आहे:

1.  हेअर कलर

2.  डेवलपर

3. एक बाऊल आणि हेअर कलर ब्रश

4.  टॉवेल

5. ग्लोव्ज

6. घड्याळ

क्रम 1: कलर मिसळणे 

कलरंट आणि डेवलपर एका प्लास्टिक बाऊलमध्ये मिसळा आणि हेअर कलर ब्रशने चांगले मिसळा म्हणजे कलर अचूकपणे तयार होईल.  कलर तुमच्या हाताला लागू नये म्हणून ग्लोव्ज घाला.

 

क्रम 2: मिश्रण लावणे 

कलर तुमच्या केसांवर गळू नये म्हणून तुमच्या डोक्याभोवती टॉवेल गुंडाळा.  कलर लावताना, नेहमी हेअरलाईनपासून सुरुवात करा. केसांचा एक लहान भाग निवडा आणि कलर या भागावर लावा. हीच कृती तुम्ही मानेवरील हेअरलाईनपर्यंत पोहोचेतोवर पुन्हा करा. कलर जास्तीत जास्त 30 मिनिटे ठेवा.

 

क्रम 3: धुवा 

30 मिनिटांनंतर, तुमचे केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा, वाहणारे पाणी स्वच्छ दिसेपर्यंत धुवा. कलर पूर्णपणे निघून गेला आहे याची खात्री करा म्हणजे प्रॉडक्ट साचून राहणार नाही.

क्रम 4: कंडीशन 

कंडीशनिंग अनिवार्य आहे. तुम्ही प्रॉडक्ट सेटमध्ये दिलेला कंडीशनर वापरु शकता. कंडीशनर लावा आणि हलकेच तुमचा टाळू आणि केस मसाज करा. कंडीशनर 3 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

 

4 सोपे क्रम आणि तुम्हाला मिळेल एक नवीन लुक!

नवीनतम कथा

Articles

लहान केसांसाठी 5 सोप्या केशरचना

'लांब केस'हे नेहमीच भारतीय सौंदर्याचे प्रमाण मानले गेले आहेत.बदलत्या काळानुसार,स्त्रिया त्यांच्या दिसण्यावर अनेक प्रयोग करीत आहेत आणि त्यांच्या लक्षात आले आहे की लहान केस देखील तितकेच आकर्षक व ट्रेंडी दिसतात.इतकेच…

Articles

बरगंडी रंगाच्या साह्याने मिळवा ग्लॅम लूक

भारतीय विवाहसोहळा हा ३-४ विधींशिवाय अपूर्ण असतो. अशा वेळेस जर आपण वधू किंवा वर यांचे जवळचे नातेवाईक असाल तर आपण प्रत्येक कार्यक्रमात  उपस्थित रहाणे आवश्यक असतं आणि त्यातील प्रत्येकात आपण…